Tuesday, 6 June 2017

प्रजनन प्रवासी ....तांबोटी खंड्या.. (Oriental Dwarf Kingfisher )...

                                                          !!!! मन करा रे प्रसन्न !!!!!


हि कविता आपण बालपणी सगळ्यांनीच ऐकली आहे. निसर्गशी मानवाचे पूर्वीपासूनच फार जवळचे नाते ज्ञात आहे. माणूस कितीही प्रगत झाला असला तरीही, रोज्मराच्या रहगड्यातून तो निसर्गभ्रमणाला जाऊनच सुखावतो. 

असाच एक मनाला प्रसन्नता देणारा पक्षी म्हणजे तांबोटी खंड्या. लाल पिवळ्या रंगाचा हा खंड्या सगळ्या त्याच्या फॅमिली मेम्बर मधे सर्वात लहान आकाराचा मनाला जातो. अगदी १४ सेंटिमीटर आकाराचा आणि १४ ते २१ ग्रॅम  वजनाचा हा पक्षी भूतान,नेपाळ, बांगलादेश, इंडिया, इंडोनेशिया, मलेशिया, म्यानमार,सिंगापुर, श्रीलंका आणि थायलंड ई. देशात आढळ्तो. 

आपली मान आणि शेपटी खाली वर करत नाट्य करत बसलेला हा आपणास बहुदा दृष्टीस पडतो. या छोट्याशा खंड्याची विशेषतः म्ह्णजे हा जून ते सप्टेंबरच्या दरम्यान खास प्रजननासाठी वेस्टर्न घाटाच्या उत्तरेकडील भागात स्थलांतर करतो. 

हा  छोटया झऱ्यांच्या बाजूला घनदाट वनात भिंतीला लागून असलेल्या ओलसर मातीत आपले खोल आणि रुंद असे घरटे बनवतो. मादा पक्ष्याकडून जेमतेम चार ते पाच अंडी घातली जातात आणि आळीपाळीने पिल्लांचे संगोपन केले जाते. सुरवातीच्या छोटया पिल्लांना छोटी बेडकं आणि फुलपाखरांच्या अळ्या अशी मेजवानी सादर केली जाते. जसजशी पिल्ले मोठी होतात तसतसे त्यांची भूक भागवण्यासाठी त्यांना मोठी बेडकं आणि सरडे भारवले जातात. आई वडील पिल्लांना भारावतानाचे दृश्य नेहमीच अतुलनीय वाट्ते आणि ते टिपत राहावेसे वाटते. 

हा पक्षी जितका देखणा आहे तेवढाच तो संवेदनशील देखील आहे. याचे छायाचित्रण करताना आपल्या या लाडक्या खंड्याला आणि याच्या पिल्लांना अपाय होऊ नये याची काळजी आपण नेहमीच घेतली पाहिजे. जेणे करून आपल्या पुढच्या पिढीलाही या सुंदर पक्ष्याचे दरवर्षी वेस्टर्न घाटात दर्शन घडू शकेल. 

अशारितीने सप्टेंबरपर्यंत हा आपले प्रजनन उरकून पुन्हा वेस्टर्न घाटाच्या दक्षिणेकडे प्रवास चालू करतो आणि पुन्हा पुढच्या पावसाळ्यात जोमाने प्रवासास सज्ज होतो. 










*Copyright @ Ashwini Nakil
  Email id : ash.nakil@gmail.com

No comments: