Saturday, 3 November 2018

राजकारण आणि प्राणिहत्या.



" Avani tigress 'had' to be killed, not because she is a confirmed man-eater, BUT because large tracts of forest land are being diverted to Reliance and other business entities, and 'it doesn't do' to allow tigers to live peacefully in their habitat."-  नोव्हेंबर  ३, २०१८ 



काँग्रेस असो वा भाजप सगळे इथे पैसे खायलाच बसले आहे. कुठे जातात स्वतःला conservationist म्हणवणारे मोठे  लोक जेव्हा असे काही प्रकार घडतात आणि मुक्या जनावरांचा जीव घेतला जातो. तेव्हा नाही प्रोटेस्ट करत हि लोक, का पैसे खाऊन गप्प बसतात ? खरंच आपण मनुष्य किती स्वार्थी आहोत,  कि आपण पैस्यासाठी काहीही करू शकतो. किती पैसे कमावणार अजून तू अंबानी, रोज जेवणात पैसेच खात असावा हा. आणि सगळं जर गव्हर्नमेंटच्याच हातात आहे कोणाला वाचवायचा आणि कोणाला मारायचा तर हि हुकूमशाही नाही का झाली ? आधी तर तुम्ही मनुष्य प्राण्यांच्या अधिवासात जाऊन त्यांना त्रास देताय एन्क्रोचमेंट करू पाहताय आणि वरून त्यांच्या अधिवासातून त्यांनाच संपवू पाहता आहे. मान्य आहे जर तो वाघ माणसांना खाऊ पाहतो आहे तर आदिवासी जात त्रासली जात आहे पण त्याला संपवणं हा काही तोडगा झाला का ? भारत देशात एवढे  चांगले तज्ञ नाहीत का जे यावर उपाय सुचवू शकतील किंवा गव्हर्नमेंटला यावर तोडगा काढायचा नाहीच आहे आणि फुकटची मतं जमा करायची आहेत किंवा पैसे खायचे आहेत. देश संपुष्टात येईपर्यंत देशाला लुटून खायचा हे जर राजकीय कार्यकर्त्यांनी ठरवलंच असेल तर काँग्रेस काय भाजप काय सारखाच झाल राव. सत्तेत आलेला प्रत्येक माणूस आपली पोळी शिजवून खातो आहे.  कोणाला मत द्यावा लोकांनी तरी. जिथे आपण पुतळे उभारण्यासाठी करोडो रुपये खर्च करतो आहे तर अश्या वाघांसाठी किंवा बिबट्यांसाठी rehablitation center बनवणं एवढा अवघड आहे का? म्हणून भारत आजही विकसनशील देशांमध्ये मोडतो कारण देशाचा भलं करण्यात नाही तर राज्यकर्त्यांचे दिवस एक्मेक्कांवर टीका करण्यात आणि पैसे हडपण्यात जात आहेत. 


आपले विचार आचार

  • स्त्री कितीही शिकली असली किंवा प्रगत झाली असली तरी चूल आणि मूल हे मानणारी संस्कृती तिचा पाठपुरावा सोडणार नाही.

  • आयुष्य आहे उतार चढण दिशा आणि वळण. कधी सुखाची पुरणपोळी तर कधी दुख्खाचे वरण.कधी शिखर यशाचा तर कधी मातीची सर. आयुष्य उतार चढण दिशा आणि वळण. कुठे श्रीमंती तर कुठे गरिबीची झळ. कुठे पाऊस  काळ्या पैशाचा तर कुठे उपाशी मरण. आयुष्य उतार चढण दिशा आणि वळण. कुठे छत काड्यांचं कुठे ना पडे उन्हाचीही सर. आयुष्य उतार चढण दिशा आणि वळण.