Saturday 3 November 2018

राजकारण आणि प्राणिहत्या.



" Avani tigress 'had' to be killed, not because she is a confirmed man-eater, BUT because large tracts of forest land are being diverted to Reliance and other business entities, and 'it doesn't do' to allow tigers to live peacefully in their habitat."-  नोव्हेंबर  ३, २०१८ 



काँग्रेस असो वा भाजप सगळे इथे पैसे खायलाच बसले आहे. कुठे जातात स्वतःला conservationist म्हणवणारे मोठे  लोक जेव्हा असे काही प्रकार घडतात आणि मुक्या जनावरांचा जीव घेतला जातो. तेव्हा नाही प्रोटेस्ट करत हि लोक, का पैसे खाऊन गप्प बसतात ? खरंच आपण मनुष्य किती स्वार्थी आहोत,  कि आपण पैस्यासाठी काहीही करू शकतो. किती पैसे कमावणार अजून तू अंबानी, रोज जेवणात पैसेच खात असावा हा. आणि सगळं जर गव्हर्नमेंटच्याच हातात आहे कोणाला वाचवायचा आणि कोणाला मारायचा तर हि हुकूमशाही नाही का झाली ? आधी तर तुम्ही मनुष्य प्राण्यांच्या अधिवासात जाऊन त्यांना त्रास देताय एन्क्रोचमेंट करू पाहताय आणि वरून त्यांच्या अधिवासातून त्यांनाच संपवू पाहता आहे. मान्य आहे जर तो वाघ माणसांना खाऊ पाहतो आहे तर आदिवासी जात त्रासली जात आहे पण त्याला संपवणं हा काही तोडगा झाला का ? भारत देशात एवढे  चांगले तज्ञ नाहीत का जे यावर उपाय सुचवू शकतील किंवा गव्हर्नमेंटला यावर तोडगा काढायचा नाहीच आहे आणि फुकटची मतं जमा करायची आहेत किंवा पैसे खायचे आहेत. देश संपुष्टात येईपर्यंत देशाला लुटून खायचा हे जर राजकीय कार्यकर्त्यांनी ठरवलंच असेल तर काँग्रेस काय भाजप काय सारखाच झाल राव. सत्तेत आलेला प्रत्येक माणूस आपली पोळी शिजवून खातो आहे.  कोणाला मत द्यावा लोकांनी तरी. जिथे आपण पुतळे उभारण्यासाठी करोडो रुपये खर्च करतो आहे तर अश्या वाघांसाठी किंवा बिबट्यांसाठी rehablitation center बनवणं एवढा अवघड आहे का? म्हणून भारत आजही विकसनशील देशांमध्ये मोडतो कारण देशाचा भलं करण्यात नाही तर राज्यकर्त्यांचे दिवस एक्मेक्कांवर टीका करण्यात आणि पैसे हडपण्यात जात आहेत. 


आपले विचार आचार

  • स्त्री कितीही शिकली असली किंवा प्रगत झाली असली तरी चूल आणि मूल हे मानणारी संस्कृती तिचा पाठपुरावा सोडणार नाही.

  • आयुष्य आहे उतार चढण दिशा आणि वळण. कधी सुखाची पुरणपोळी तर कधी दुख्खाचे वरण.कधी शिखर यशाचा तर कधी मातीची सर. आयुष्य उतार चढण दिशा आणि वळण. कुठे श्रीमंती तर कुठे गरिबीची झळ. कुठे पाऊस  काळ्या पैशाचा तर कुठे उपाशी मरण. आयुष्य उतार चढण दिशा आणि वळण. कुठे छत काड्यांचं कुठे ना पडे उन्हाचीही सर. आयुष्य उतार चढण दिशा आणि वळण. 

Tuesday 6 June 2017

प्रजनन प्रवासी ....तांबोटी खंड्या.. (Oriental Dwarf Kingfisher )...

                                                          !!!! मन करा रे प्रसन्न !!!!!


हि कविता आपण बालपणी सगळ्यांनीच ऐकली आहे. निसर्गशी मानवाचे पूर्वीपासूनच फार जवळचे नाते ज्ञात आहे. माणूस कितीही प्रगत झाला असला तरीही, रोज्मराच्या रहगड्यातून तो निसर्गभ्रमणाला जाऊनच सुखावतो. 

असाच एक मनाला प्रसन्नता देणारा पक्षी म्हणजे तांबोटी खंड्या. लाल पिवळ्या रंगाचा हा खंड्या सगळ्या त्याच्या फॅमिली मेम्बर मधे सर्वात लहान आकाराचा मनाला जातो. अगदी १४ सेंटिमीटर आकाराचा आणि १४ ते २१ ग्रॅम  वजनाचा हा पक्षी भूतान,नेपाळ, बांगलादेश, इंडिया, इंडोनेशिया, मलेशिया, म्यानमार,सिंगापुर, श्रीलंका आणि थायलंड ई. देशात आढळ्तो. 

आपली मान आणि शेपटी खाली वर करत नाट्य करत बसलेला हा आपणास बहुदा दृष्टीस पडतो. या छोट्याशा खंड्याची विशेषतः म्ह्णजे हा जून ते सप्टेंबरच्या दरम्यान खास प्रजननासाठी वेस्टर्न घाटाच्या उत्तरेकडील भागात स्थलांतर करतो. 

हा  छोटया झऱ्यांच्या बाजूला घनदाट वनात भिंतीला लागून असलेल्या ओलसर मातीत आपले खोल आणि रुंद असे घरटे बनवतो. मादा पक्ष्याकडून जेमतेम चार ते पाच अंडी घातली जातात आणि आळीपाळीने पिल्लांचे संगोपन केले जाते. सुरवातीच्या छोटया पिल्लांना छोटी बेडकं आणि फुलपाखरांच्या अळ्या अशी मेजवानी सादर केली जाते. जसजशी पिल्ले मोठी होतात तसतसे त्यांची भूक भागवण्यासाठी त्यांना मोठी बेडकं आणि सरडे भारवले जातात. आई वडील पिल्लांना भारावतानाचे दृश्य नेहमीच अतुलनीय वाट्ते आणि ते टिपत राहावेसे वाटते. 

हा पक्षी जितका देखणा आहे तेवढाच तो संवेदनशील देखील आहे. याचे छायाचित्रण करताना आपल्या या लाडक्या खंड्याला आणि याच्या पिल्लांना अपाय होऊ नये याची काळजी आपण नेहमीच घेतली पाहिजे. जेणे करून आपल्या पुढच्या पिढीलाही या सुंदर पक्ष्याचे दरवर्षी वेस्टर्न घाटात दर्शन घडू शकेल. 

अशारितीने सप्टेंबरपर्यंत हा आपले प्रजनन उरकून पुन्हा वेस्टर्न घाटाच्या दक्षिणेकडे प्रवास चालू करतो आणि पुन्हा पुढच्या पावसाळ्यात जोमाने प्रवासास सज्ज होतो. 










*Copyright @ Ashwini Nakil
  Email id : ash.nakil@gmail.com

Monday 6 March 2017

निसर्ग हि आपली कि माझी जवाबदारी ?



का नाही कळत हे लोक्कांना कि तुम्ही नद्यांना दिलेला कचरा हा शेवटी थेट तुमच्या पर्यंत पुरामार्फत भविष्यात परत तुम्हालाच मिळणार आहे. जागोजागी तुम्ही निर्माल्या म्हणून कचरा घालता तर कुठे सरळ प्लास्टर ऑफ पॅरिस च्या मुर्त्या नदी आणि समुद्राला अर्पण करता. ज्या नदीच्या किनारी तुम्ही थंड हवेसाठी विसावता आणि change म्हणून जेव्हा शहरी वस्ती पासून दूर एखाद्या नदीवर वा समुद्रा किनाऱ्यावर जाऊन बसता तेव्हा हेच beaches तुम्हाला कचरामय दिसतात आणि परत तुम्हीच नावे ठेवता कि आपले beaches किती घाण आहेत, बाहेरचे देश पहा किती सुवाच्छ आणि सुंदर आहेत. पण एकदा हि विचार नाही करत की या सगळ्याला जवाबदार कोण? अगदी पदवीधर असलेल्या स्त्रिया पुरीषही नद्यांमध्ये कचरा टाकताना दिसतात. काही म्हटले तर तुम्ही कोण बोलणारे असे उत्तर मिळते. हि स्थिती फक्त नद्या आणि समुद्रांचीच नाही तर प्रेक्षणीय स्थळे आणि किल्ले, जंगले सुद्धा यात सामील आहेत. हल्ली जंगले तर काही लोक्कांसाठी दारूचे अड्डे झालें आहेत. जागोजागी प्लास्टिक आणि दारूच्या बाटल्या दर्शनास पडतात. तर मजेसाठी ट्रेक करणारे आधुनिक लैला मजनू मंडळींची नावे किल्य्यांवर लिहलेली आढळतात. ट्रेन मधून नद्यांमधे प्लॅटिकच्या पिशवीत निर्माल्य टाकणारे तुम्ही लोक ; तुम्हाला निसर्ग हा सुद्धा आपला देव आहे असे का नाही वाटत ? तो आपल्याला घडवू शकतो तर संपवू हि शकतो. निसर्ग हा माझा आहे असा विचार करून आपण आपली वृत्ती नक्कीच बदलू शकता ....पण........पण.......पण !!!!!!!

Unkonwn Copyright..........Heaps of Nirmalya in rivers...






 *Copyright @Ashwini D.Nakil
  Email id: ash.nakil@gmail.com

Wednesday 8 February 2017

आंबोली एक प्रवास !!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!

पावसाळा म्हटलं कि सरीसृपांचा मौसम ! आणि सरीसृप म्हटले की अगुंबे आणि आंबोली ह्या दोन्ही ठिकाणांची नावे पटकन तोंडावर येतात. 

Amazing Amboli

            आंबोली हे महाराष्ट्राच्या दक्षिण टोकाला वसले असून महाराष्ट्राच्या पश्चिम घाटात त्याचा समावेश केला जातो.अंबोली म्हणजे पुर्वीपासुन अगदी सरिसृपांसाठी (Reptiles) famous असा अड्डा आहे आणि मला आधीपासुन सरिसृपांबद्द्ल कुतुहल आहे. म्हणुन मनाला अगदी अधीपासुन हुरहुर लागुन राहीली की कधी मला तिथे जाता येईल. आणि एकदा अचानक आम्हा तीन गड़्यांचा Plan ठरला आणि 18,19,20 ऑगस्ट असा programme झाला. सरिसृपांसाठी रात्री trail साठी सामान जमवाजमव सुरु झाली. गडी सुरजने तर भला मोठा 400 रू. चा एक Torch च  विकत घेतला. Malabar gliding frog (Rhacophorus malabaricus) आणि Malabar Pit Viper (Trimeresurus malabaricus) हे माझ्या wishlist च्या top वर होते. 18 ऑगस्टला आम्ही Express गाडी ने प्रवास चालु केला. दुसऱ्या दिवशी 11 वाजता आम्ही सावंतवाडी मधे मुक्काम ठोकला. पुढचा आंबोली प्रवास आम्ही बसने केला . बसमधून प्रवात करत असतानाच घाटाची सुंदरता मन मोहून टाकत होती आणि मुंबईच धकाधकीचं जीवन सोडून माळरानात येऊन जीव सुखावल्यागत वाटून राहिला होता. 

        पहिल्या दिवशी 19 ऑगस्टला संध्याकाळीं 6 पर्यंत आमचा चेक-इन आटोपला आणि फ्रेश होऊन आम्ही रात्रीं 10 ला आमच्या Night trail ला निघलो. आमच्या रूमच्या बाहेर सतत एकसारखे डराव- डराव  कानी पडत होते. पण हे frogs एवढे Camouflage होते की शोधून सापडत नव्हते. पण तिथेच गवतात एक  funnel-web spider दिसला. 
         
Funnel Web Spider

           पुढे आम्ही महादेवगडच्या दिशेने वाटचाल केली. तिथे आम्हाला आणखी  काही spider species आणि  White-tailed Woodrat (Madromys blanfordi), Brooks Gecko(Hemidactylus brookii), Yellow browed bulbul  (Acritillas indica) चे जोडपे, Red-vented bulbul (Pycnonotus café)  नीद्रास्त असताना दर्शनास पडले. पहिल्या दिवशी पावसाने आम्हाला बक्ष दिले आणि आम्ही रात्री 3 वाजता आमचा Night trail अटोपून रूम वर परतलो. आधीच जेवलो असलो तरीही पायपीट करून भयंकर भूक लागली होती, ती कशीबशी आवरून आम्ही झोपी गेलो.

Brook’s Gecko (Hemidactylus brookii)

Someone is hidden downside -Spider Sps

So Creatively webbed it is !

            दुसऱ्या दिवशी २० च्या  सकाळी आम्ही पुन्हा 10 वाजता आमची गाडी Photography च्या दिशेने वळवली. पावसात  Photography करण्याच्या दृष्टीने मोठ्या दोन छत्र्या घेऊन आलो होतो पण आंबोली ला पोचलो तेव्हाच बस मधे दोन्ही छत्र्या हरव्ल्या. मग पावासापासून वाचत वाचत आणि कॅमेरा झाकत झाकत आम्ही आपली फोटोग्राफी चालू ठेवली . त्या दिवशी सकाळी आम्हाला Grey-fronted green pigeon (Treron affinis) , Jungle babbler (Turdoides striata), White-throated kingfisher (Halcyon smyrnensis), White-bellied blue flycatcher (Cyornis pallipes)  हे पक्षी दिसले.  अगदी 12 च्या सुमारास सुद्धा दाट धुक्यांनी घाट पिंजून निघाला होता. डराव- डराव (frogs) शोधण्यासाठी आम्ही पार डाबके- डबके आणि झऱ्या -झाऱ्याने पावसा-पाण्यात भिजून पायपीट करत होतो.

Fungus Spc

            दुसऱ्या दिवशी संध्याकाळी आम्हाला एक गृहस्थ दिसले , ते फार लांबून खास Malabar gliding frog चा फोटो काढायला तिथं आले होते. त्यांनी आम्हाला Malabar gliding frog कुठे मिळेल याची एक साधारण कल्पना दिली.

        त्या दिवशी संध्याकाळी ७ वाजता आम्ही दुसऱ्या एका पठाराच्या दिशेने गेलो. तिकडे आम्हाला Moon Moth (Actias luna), Owl moth,  एक Common Vine Snake (Ahaetulla nasuta) ,Bicoloured frog (Clinotarsus curtipes) दिसला .ती सांध्याकाळ जरा भकास च गेली. जास्त काही दिसले नाही म्हणून आम्ही जरा निराश होतो. Malabar pit viper न दिसल्याचे दु:ख मला सलत होते.


Common Vine Snake (Ahaetulla nasuta)

Moon Moth (Actias luna)

Bicoloured frog (Clinotarsus curtipes)

             तिसऱ्या दिवशी रात्री संध्याकाळी आम्ही भर पावसात तीन ते चार तास Malabar gliding frog (Rhacophorus Malabaricus) च्या शोधात होतो आणि तो शेवटी आम्हाला रात्री 11 वाजता एका  गार्डन  मधे एका छोट्याश्या डबक्यामधें बांधलेल्या हत्तीच्या कालाकृतीवर सापडला. Narrow-mouthed frog (Microphyla ornata) सुद्धा त्याच डबक्याच्या बाजूला डराव- डराव करत दिसुन आला. ह्या दोघांचे फोटो टिपून आम्ही रूमच्या दिशेने पावले हलMicrohyla  ornataवली.

Narrow Mouthed frog (Oreophryne nana)

Malabar Gliding frog (Rhacophorus malabaricus)

Amboli Bush frog (Pseudophilautus amboli)

Ichthyophis davidi (caecilian)

सारंग म्हात्रे  या आमच्या मित्रामुळे आम्हाला म्णजे सुरज मालुसरे आणि मला  काही orchids plants पाहायला मिळाले.

Habenaria heyneana (Orchid)

या सगल्या गमतीदार Sightings मधे सुट्या कधी संपल्या कळलेच नाही आणि निघायची घडी ठरली. पण Malabar pit viper 🐍 न गवसल्याची  खंत खुपत होती . कदाचित तोही सुट्टीवर गेला असावा. 😄😄😄😄

On foggy roads of Amboli

Gang of 3 Me,Suraj & Sarang.

अतिशय  मजेदार ट्रिप झाली आणि सावंतवाडी स्टेशनवर आल्यावर कळले कि आम्ही आमचे रेसेर्व्हशन चुकवले होते. ट्रेन २० तारखेला रात्रीची होती आणि आम्ही २१ च्या रात्री स्टेशन ला होतो. आंबोली मधे  आम्ही पार रंगून गेलो होतो कि परतिचा दिवस एकाच्याही लक्षात नव्हता. पण ट्रिप एवढी सुंदर झालेली कि त्याची आम्हाला अजिबात पर्वा नव्हती कि आम्ही ट्रेन मिस केली होती.  या सगळ्या आठवणी घेऊन आम्ही परतिचा प्रवास दुसऱ्या ट्रेन ने चालू केला.

Beauty of Nature don’t require caption!!!!




****************Checklist of Amboli********************


1. Reptile and Amphibians

Common Vine Snake (Ahaetulla nasuta)
Malabar Gliding frog (Rhacophorus malabaricus)
Bull frog
Narrow Mouthed frog (Microhyla  ornata)
Amboli tiger Taod (Xanthophryne tigerinus)
Amboli Bush frog (Pseudophilautus amboli)
Duttaphrynus Sps
Fejervarya Sps
Bicoloured frog (Clinotarsus curtipes)
Deccan Banded Gecko (Cyrtodactylus deccanensis)
Brook’s Gecko (Hemidactylus brookii)
Ichthyophis davidi (caecilian)
Kolhapur Day Gecko (Cnesmaspis kolhapurensis)
Swamp eel.

2.Spiders

Unknwn Spc of spiders
Daddy long-legs spiders (Pholcidae family)
Huntsman Spider (Olio Sps)

3.Mammals 

White-tailed wood rat (Madromys blanfordi), 
Golden Jackal (Canis aureus)

4. Plants

Rock balsam
Habenaria panchganiensis
Habenaria plantaginea
Habenaria heyneana
Eria Exillis ( Silverleaf orchid)
Karvi (Strobilanthes callosus)
(Dendrobium barbatulum) (orchid)
Habenaria Digitata (orchid)
Hoya (Vine Climber)

5.Birds

Black Bulbul (Hypsipetes leucocephalus)
Red Vented Bulbul (Pycnonotus cafer)
Yellow Browed bulbul (Acritillas indica) 
Grey-fronted green pigeon (Treron affinis) 
Green bea- eater (Merops orientalis)
Southern Coucal (Centropus sinensis)
Jungle Babbler (Turdoides striata)
White bellied Blue flycatcher (Cyornis pallipes) 

6.Insects

Centipede sps
Millipede sps

7. Butterflies & Moths

Blue Mormon (Papilio polymnestor)
Moon Moth (Actias luna)
Awl Moth
Southern birdwing (Troides minos)
Lime blue butterfly (Chilades laius)




 *Copyright @Ashwini D.Nakil
  Email id: ash.nakil@gmail.com


Monday 12 September 2016

Birding at Tikujiniwadi...

           Tikujiwadi is also known as second door of the Sanjay Gandhi National Park (SGNP) (Borivali) and also it is another entry point for Yeoor, which is also a part of SGNP.
             TIkujiniwadi is located at Ghodbandar Road at Thane. It is famous birding spot amongst various birders around Mumbai because of its great diversity and beauty. Apart from birds it also consists of one small butterfly garden inside the park… so it’s also part of attraction for butterfly lovers.....  I wanted to visit Tikujiwadi since a long time as i am a birder and finally we made a plan to go on 3rd December, 2015.
             On the same morning we means my so called birding buddies RP (Rajesh Poojare) and DP (Darshan Potdar) reached at 7.00 am at the park and started our birding with hunger of so many number of birds.. And as soon as we enter inside the park Asian Paradise Flycatcher (M) gave us warm welcome wearing his black and white coat with long beautiful tail….There were many people had come for morning walk in the park …and they were wondering that why we were starring at trees…. Haha… After that we got to see one individual of Sulphur-bellied Warbler into the canopy… without wasting time we started walking ahead …and further we heard a took …took… call of Copporsmith Barbet and seen it over one bark of tree…. We ended our trail at 11.00 am… and we could sight about 50 species of birds during our trail and many butterflies…




·         Butterflies:

1. Spotted small flat
2. White Orange Tip
3. Yellow Orange Tip.  
4. Peacock Pansy.
5. Grey Pansy
6. Lemon Pansy
7. Blue Tiger.
8. Stripped Tiger
9. Plain Tiger.
10. Great orange Tip.
11. Common Crow.
12. Common Grass Yellow.


Birds:

1. Little Cormorant:  2
2.Indian Cormorant: 2
3. Little Egret: 1
4.Cattle Egret :1
5.Indian Pond-Heron :2
6.Black-shouldered Kit:1
7.Oriental Honey-buzzard: 3 ,all 3 were pale morph.
8.Black Eagle:1, Observed for about an hour. Confirmed the species with the yellow bill base (cere) and feet using binocular and camera.
9. Booted Eagle: 1, all dark morph species.
10.Steppe Eagle: 1
11.White-eyed Buzzard: 1
12.Shikra:3
13.Black Kite:15
14.Rock Pigeon (Feral Pigeon): 20
15.Greater Coucal: 1
16.Asian Koel: 1
17.Asian Palm-Swift: 25
18.White-throated Kingfisher: 3
19.Green Bee-eater: 15
20.Indian Roller :2
21. Coppersmith Barbet :5
22.Brown-headed Barbet :1    , in flight
23.Common Woodshrike : 1
24.Common Iora : 2
25.Long-tailed Shrike : 2
26.Indian Golden Oriole : 1
27.Black-hooded Oriole:  1
28.Black Drongo  :1
29.Ashy Drongo  :2
30.Black-naped Monarch:  2
31.Indian Paradise-Flycatcher:  1 
32.House Crow  :10
33.Large-billed Crow: 16
34.Dusky Crag-Martin: 25
35.Red-vented Bulbul:  25
36.Red-whiskered Bulbul:  1
37.Common Chiffchaff:  1
38.Sulphur-bellied Warbler :1
39.Blyth's Reed-Warbler: 1
40Common Tailorbird:  1
41.Gray-breasted Prinia:  2
42.Ashy Prinia:  10
43.Jungle Babbler: 21
44.Oriental Magpie-Robin:  10
45.Red-breasted Flycatcher: 2
46.Common Myna:  5
47.Pale-billed Flowerpecker: 5
48.Purple-rumped Sunbird:  5
49.Purple Sunbird:10
50. Chestnut-shouldered Petronia: 2