का नाही कळत हे लोक्कांना कि तुम्ही नद्यांना दिलेला कचरा हा शेवटी थेट तुमच्या पर्यंत पुरामार्फत भविष्यात परत तुम्हालाच मिळणार आहे. जागोजागी तुम्ही निर्माल्या म्हणून कचरा घालता तर कुठे सरळ प्लास्टर ऑफ पॅरिस च्या मुर्त्या नदी आणि समुद्राला अर्पण करता. ज्या नदीच्या किनारी तुम्ही थंड हवेसाठी विसावता आणि change म्हणून जेव्हा शहरी वस्ती पासून दूर एखाद्या नदीवर वा समुद्रा किनाऱ्यावर जाऊन बसता तेव्हा हेच beaches तुम्हाला कचरामय दिसतात आणि परत तुम्हीच नावे ठेवता कि आपले beaches किती घाण आहेत, बाहेरचे देश पहा किती सुवाच्छ आणि सुंदर आहेत. पण एकदा हि विचार नाही करत की या सगळ्याला जवाबदार कोण? अगदी पदवीधर असलेल्या स्त्रिया पुरीषही नद्यांमध्ये कचरा टाकताना दिसतात. काही म्हटले तर तुम्ही कोण बोलणारे असे उत्तर मिळते. हि स्थिती फक्त नद्या आणि समुद्रांचीच नाही तर प्रेक्षणीय स्थळे आणि किल्ले, जंगले सुद्धा यात सामील आहेत. हल्ली जंगले तर काही लोक्कांसाठी दारूचे अड्डे झालें आहेत. जागोजागी प्लास्टिक आणि दारूच्या बाटल्या दर्शनास पडतात. तर मजेसाठी ट्रेक करणारे आधुनिक लैला मजनू मंडळींची नावे किल्य्यांवर लिहलेली आढळतात. ट्रेन मधून नद्यांमधे प्लॅटिकच्या पिशवीत निर्माल्य टाकणारे तुम्ही लोक ; तुम्हाला निसर्ग हा सुद्धा आपला देव आहे असे का नाही वाटत ? तो आपल्याला घडवू शकतो तर संपवू हि शकतो. निसर्ग हा माझा आहे असा विचार करून आपण आपली वृत्ती नक्कीच बदलू शकता ....पण........पण.......पण !!!!!!!
Unkonwn Copyright..........Heaps of Nirmalya in rivers...
*Copyright @Ashwini D.Nakil
Email id: ash.nakil@gmail.com
